Shiv Sena Meeting | मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
मुंबईतील महिला विकास मंडळाच्या सभागृहात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दुपारी दोन वाजता होणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावावर पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या इतर महत्वाच्या पदांसाठी देखील महत्वाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक पक्षाला पाच वर्षातून एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करणे आवश्यक असते.