Shiv Sena : शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना 'दे धक्का', 8 राज्यातील शिवसेना प्रमुखांचं शिंदेंना समर्थन
हाराष्ट्रात शिवसेनेला खिंडार पाडणाऱ्या शिंदे गटानं आता महाराष्ट्राबाहेर देखील धक्का देण्यास सुरुवात केली आहे.. मंगळवारी झालेल्या बैठकीत इतर राज्यातील शिवसेना प्रमुखांनी शिंदे गटाला समर्थन देत उद्धव ठाकरेंना नवा धक्का दिलाय... जवळपास 8 राज्यातील शिवसेना प्रमुखांनी शिंदे गटाला समर्थन दर्शवलंय.. ज्यात दिल्ली,मध्यप्रदेश छत्तीसगढ़,मणिपुर, गोवा,बिहार या राज्यांचा समावेश आहे.. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात निवडणूक आयोगाच्या कोर्टात अस्तित्वाची लढाई सुुरु आहे. खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटांनी महाराष्ट्राबाहेर मोठी बाजी मारलीय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही..