Sharad Pawar EXCUSIVE : शरद पवार आजपासून तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर, दुष्काळी भागाचा करणार दौरा

Continues below advertisement

यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली. या लढतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर विजय मिळवला. बारामतीमधील (Baramati Lok Sabha) या विजयानंतर एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभेच्या निकालानंतर बारामतीच्या वातावरणात मोठा फरक दिसून येत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये व्यापारी महासंघाने शरद पवार (Sharad Pawar) यांचा मेळावा घेण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यासाठी काही थातुरमातूर कारणे देण्यात आली होती. मात्र, आता बारामती जिंकल्यानंतर त्याच शरद पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये पायघड्या घालण्यात आल्या आहेत. शरद पवार हे मंगळवारी बारामतीत येणार आहेत. शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या काळात शरद पवार लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. याशिवाय, बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी बारामतीध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी परिसंवाद पार पडणार आहे. या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण मार्च महिन्यात बारामतीमध्ये व्यापारी महासंघाने शरद पवार यांचा मेळावा घेण्यास नकार दिला होता. यामागे अजित पवार यांच्याकडून येणार दबाव कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आज शरद पवार त्या अनुषंगाने व्यापारी मेळाव्यात काही भाष्य करणार का, हे पाहावे लागेल.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram