Sharad Pawar On Nilesh Lanke : अजित पवारांना लंकेंचा रामराम? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

Nilesh Lanke, अहमदनगर : "अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही.", असं पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले. निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दरम्यान, आज नगर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यावर आता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शरद पवार पाहा व्हिडिओ...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram