Sharad Pawar NCP Symboll Tutari : बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हावरून संभ्रम होणार?
Continues below advertisement
बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच आता शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेची चिंता काही प्रमाणात का होईना नक्कीच वाढलेली असेल. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केलाय. शिरुर लोकसभेत तुतारी हे चिन्ह मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहता ट्रम्पेट चिन्हाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काही फटका बसतो का? हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.
Continues below advertisement