Sharad Pawar Meeting EVM : देशभरातील विरोधीपक्षांचा EVM वर आक्षेप, शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक
Continues below advertisement
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी ईव्हीएमबाबत टीका केलीय. जिथं जिथं ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तिथं तिथं मतं भाजपला गेल्याचं अनेकदा समोर आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याचसोबत, अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये ईव्हीएमचा वापर थांबवण्यात आलाय, मग भारतातच ईव्हीएमचा हट्ट का? असा सवालही विरोधकांनी केलाय. त्याचसोबत, ईव्हीएमबाबत संभ्रम दूर करावा, अशी मागणी करूनही निवडणूक आयोग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
Continues below advertisement