Sharad Pawar Meeting : शरद पवारांनी दिल्लीत बोलावली राष्ट्रवादीच्या कार्यकरिणीची बैठक : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आज दिल्लीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेणार आहे. २ जुलै रोजी अजित पवार यांनी ८ आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथविधी घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केलाय. काल मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. या पार्श्वभूमीवर पवारांनी आज दिल्लीत कार्यकारिणीची बैठक बोलावलीय. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram