Shantigiri Maharaj Nashik Loksabha : शिवसेनेकडून मी अर्ज भरला, शांतिगिरी महाराजांची प्रतिक्रिया
Nashik Lok Sabha Constituency : महायुतीत (Mahayuti) नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून (Shivsena Shinde Faction) अर्ज भरला आहे.
शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.