ABP Majha Headlines : 07:00 AM : 10 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
आमदार संजय गायकवाड यांच्या आमदार निवासातील राड्याप्रकरणी तीस तासांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आकाशवाणी आमदार निवासातील अजंटा कॅटरर्सचा परवाना निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य न्याय दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. कमी वयात चांगले काम केल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी दिले. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याची घोषणा सरकारने केली आहे. यापुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून, तोडगा काढण्यासाठी आज विधान भवनात बैठक होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेने याबाबत माहिती दिली. मोरोपंत पिंगळे यांच्या पंचाहत्तरीची आठवण सांगत भागवतांनी पंचाहत्तर ही शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो, असे सुतोवाच केले. पंचाहत्तरनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असेही विधान त्यांनी केले. राजकीय निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य नैसर्गिक शेती करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील कार्यक्रमात सांगितले. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली असून, मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. निकेत कौशिक हे नवे पोलीस आयुक्त असतील. मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिराच्या पाडकामाची कारवाई योग्यच असल्याचे उच्च न्यायालयानेदेखील मान्य केले आहे. पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश दिले आहेत. दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा पूल सिंदूर नावाने ओळखला जाणार असून, वाहतूककोंडीपासून सुटका होणार आहे. शहापूरच्या एका खासगी शाळेत मासिकपाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली असून, आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विदर्भात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध मंदिरांमध्ये सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी आहे. उद्योजक इलॉन मस्क यांची भारताच्या इंटरनेट सेवा क्षेत्रात एन्ट्री झाली असून, स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठीचे लायसन्स मंजूर झाले आहे. जिओसह भारतातील बऱ्याच कंपन्यांना यामुळे टक्कर मिळणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पहिली टी-ट्वेंटी मालिका जिंकली असून, चौथ्या सामन्यात सहा विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत तीन-एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.
Continues below advertisement