ABP Majha Headlines : 07:00 AM : 08 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आव्हान दिलं आहे. मराठी आंदोलकांना दाऊदसारख्या दहशतवाद्यांशी उपमा दिल्याने वाद निर्माण झाला. यावर ठाकरे गटाकडून भाजपवर पलटवार करण्यात आला असून, भाजप मराठीचा मारेकरी असल्याची टीका झाली आहे. मोदी आणि शहांनी निशिकांत दुबेंना समज द्यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांना युतीसंदर्भात बोलण्यापूर्वी विचारण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे मनसेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाषावादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "भारतात सर्वच भाषा राष्ट्रभाषा आहेत," असे संघाने म्हटले आहे. दरम्यान, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये विसर्ग सुरू असून, गोसीखुर्द धरणातील सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola