![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.in/2019/11/1e5cf1c957279aea67244c5ef6d0391d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Karnataka MLA Disqualification | कर्नाटकातील 17 अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; पोटनिवडणूक लढवता येणार | ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटकातील 17 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकतात, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे पक्षबदलू आमदारांना दिलासा मिळाला आहे. काँग्रेस-जेडीएसमधून पक्षांतर करुन भाजपच्या गोटात सहभागी झालेल्या 17 आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी अपात्र ठरवले होते. सभापतींनी पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत या आमदारांवर कारवाई केली होती. या आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने त्यांना विद्यमान विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यास प्रचलित कायद्यानुसार मनाई करण्यात आली होती. त्यामुळं आगामी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणण्यास हे आमदार अपात्र ठरले होते.
Continues below advertisement