Sanjay Raut on Ramdas Kadam MLC : रामदास कदम निष्ठावंत शिवसैनिक...

शिवसेनेनं विधान परिषदेसाठी मुंबईतून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी घोषित केलीय. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज अधिकृत घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्ता कापला गेल्याचं आता स्पष्ट झालंय. आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळी विधानसभेची जागा सोडली होती. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेंना विधान परिषदेत संधी देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेकडून एकाला विधानपरिषदेवर पाठवले जाते. 2016 मध्ये रामदास कदम यांना आमदार म्हणू पाठवण्यात आले. मात्र रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola