Sanjay Raut Full PC : नरेंद्र मोदींनी शिवसेना फोडल्याबद्दल एकनाथ शिंदेंच्या पाठीवर थाप मारली असावी
निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आजपासून युक्तिवाद होतायत. त्याच पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय. शिंदेंवर मेहेरबानी म्हणून त्यांच्या पक्षाला नाव दिलं गेलंय. मात्र ही खरी सुनावणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.