Sanjay Raut | 'आरोप दुर्दैवी, सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं', संजय राऊतांचा सरकारला सल्ला
नाशिक : सध्या राज्यासह देशभरात मुंबईचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांच्या पत्राची चर्चा आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय आहे. नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब मात्र यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. या प्रकरणी स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.