संजय राऊतांच्या गृहमंत्र्यांवरील वक्तव्यावर वाद टाळण्याचा अजित पवारांचा सल्ला - संजय निरुपम
बारामती : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्या 'रोखठोक' टीका केली आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊतांच्या या मतावर टीका केली आहे.