Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा

Continues below advertisement

Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा.. ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा... पाहा संपूर्ण व्हिडिओ

हे देखील वाचा

 

Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...

Suresh Dhas : ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे.  त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते. 

सुरेश धस म्हणाले की, जगात जर्मनी अन् देशात परभणी असे देशात नाव आहे. मी या परभणीचा 18 महिने पालकमंत्री राहिलेलो आहे. परभणी किती रगेल आहे हे मला माहितीय. या परभणीत सोमनाथ सूर्यवंशी हा वकिलीचे शिक्षण घेणारा मुलगा. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय आंदोलन करताहेत, तेही आपलेच लोक आहेत. कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सोमनाथच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आणि वाकोडे साहेबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमनाथ सूर्यवंशी  कुटुंबीय, वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram