Sanjay Jadhav Parbhani : जे मायबापालाच 5-5 वर्ष भेटत नाही तर मतदारांना काय भेटणार ? संजय जाधव
Continues below advertisement
परभणी जिल्ह्यात तिन्ही पक्षात एकही उमेदवार नव्हता का? जे मायबापालाच ५-५ वर्ष भेटत नाही तर मतदारांना काय भेटणार, अशी टीका परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी महादेव जानकर यांच्यावर केलीय. शिवाय भाजपला जातीजातीत, धर्मात, माणसांत भांडण लावून आपली पोळी भाजून घायची आहे, असंही संजय जाधव म्हणाले. जिंतूर इथे काल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ संयुक्त प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना संजय जाधव यांनी महादेव जानकर आणि भाजपला जोरदार लक्ष केलं.
Continues below advertisement