Sanjay Gaikwad Exclusive : उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, उमेदवारीवर ठाम आहे : संजय गायकवाड
Continues below advertisement
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे. मात्र त्यांचं नाव जाहीर होण्याआधीच आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन उमेदवारी अर्ज भरला. गायकवाड आपला अर्ज मागे घेतील असं जाधव म्हणाले. पण गायकवाड तूर्तास करी अर्ग मागे घेणार नाहीयेत.. तशी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाला दिलीये. मी बंड केलेलं नाही पण मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे, चार तारखेनंतर कळेल काय होतं ते असं गायकवाड म्हणाले.
Continues below advertisement