Sangli : जतमधील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी आक्रमक
सांगलीच्या जतमधील पाण्यापासून वंचित नागरिक पुन्हा कर्नाटकात जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. पाणी आणि इतर सुविधांच्या मागणीसाठी जतच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त नागरिक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार आहे. उमदी, सुसलाद, बालगाव,हळळी, अंकलगी, तिकोंडी, भिवर्ग, करजगीसह २५ ते ३० गावातील दुष्काळग्रस्त नागरिक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समावेशाबाबत साकडं घालणार आहे.