Sandipan Bhumre on Uddhav Thackeray : आमच्यात हिंमत म्हणून तुम्ही मैदानात, भुमरेंचं ठाकरेंना उत्तर
शिवसेनेतील बंडखोरांना मैदानात या असं आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्यामुळेच तुम्ही मैदानात आलात असं भुमरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी काल षण्मुखानंद सभागृहात बोलताना बंडखोरांबाबत वक्तव्य केलं होतं.