Sambhaji Bhide Special Report : संभाजी भिडेंचं वक्तव्य आणि राज्यभर वादाचं सत्र सुरु

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याच्या निमित्तानं भिडे गुरुजी काल मंत्रालयात आले होते. भिडे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचं कारण विचारण्यासाठी एबीपी माझासह सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भिडे गुरुजींनी एका महिला पत्रकाराला उद्देशून, कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य केलं. राज्य महिला आयोगानं त्या वक्तव्याची दखल घेऊन, भिडे गुरुजींना नोटीस पाठवलीय. त्यावरुन मोठा वादंग उठलाय. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola