Samana on Ajit Pawar | सामनातून भाजपवर टीकास्त्र, टोणगा म्हणत अजित पवारांवर निशाणा | ABP Majha

अजित पवार यांचं बंड फसल्याचं सांगत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर जोरदार तोंडसुख घेण्यात आलंय. लाडू पचतील काय... बंड फसले अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून शिवसेनेनं भाजप आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. भाजपनं बहुमत सिद्ध करणं म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखं अशा शब्दांत भाजपवर सामनामधून निशाणा साधण्यात आलाय. टोणगा म्हणत अजित पवारांनाही लक्ष्य करण्यात आलंय. अजित पवारांना तुरुंगात पाठवू म्हणणारे त्यांच्या नावाने घोषणा देत होते मात्र कुठेही जल्लोष नव्हता असंही या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. मुंडके गाढवाचे आणि धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारण्यात आल्याची खरमरीत टीकाही अग्रलेखातून करण्यात आलीय. सत्तेसाठी भाजपनं राजभवनाचा गैरवापर केल्याचा आरोप करत भाजपला लक्ष्य करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola