ABP News

Rupali Thombare On Rahul Shewale : आरोप करणाऱ्या महिलेसह शेवाळेंविरोधात कोर्टात जाणार : ठोंबरे

Continues below advertisement

Rahul Shewale : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केलं. माझ्या पक्षातील लोकच त्या महिलेला संपर्क करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मला या प्रकरणी मदत केली असल्याचं शेवाळेंनी सांगितलं. त्या महिलेला कोरोनाच्या काळात मी मदत केली असल्याचा खुलासाही त्यांनी केला. त्यानंतर त्या महिलेनं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळेंनी सांगितले. याप्रकरणाची NIA  कडून (National Investigation Agency) चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी शेवाळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर आरोप करणाऱ्या महिलेला घेऊन शेवाळेंविरोधात  कोर्टात जाणार असं मत रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram