Rupali Chakankar on Missing Girl : बेपत्ता महिलांच्या तपासणीसाठी शोध मोहिम राबवावी : ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील मुली आणि महिला बेपत्ता होण्याची गेल्या काही महिन्यांमधली आकडेवारी चिंताजनक आहे. या महिलांच्या तपासासाठी गृह विभागानं समिती स्थापन करत शोध मोहिम राबवावी, तसंच दर पंधरा दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याची सूचनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गृह विभागाला केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. त्यात 16 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्र पोलीस आणि गृह विभागाकडून बेपत्ता महिलांच्या त पासासाठी करण्यात असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.
Continues below advertisement