MPSC Student Protest : MPSC च्या आंदोलनाबाबतीत राजकारण करु नये, निर्णयाला उशीर झाला : Rohit Pawar

MPSC News : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा (MPSC) नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola