Rohit Pawar On Baramati Sugar Mill: भाजपनं लक्षात ठेवावं आम्ही झुकणारे नाहीत रोहित पवारांचा हल्लाबोल

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं जबर दणका दिला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं कन्नड सहकारी साखर कारखाना शिखर बँकेकडून खरेदी केला होता. हा कारखाना, त्यातील मशीनरी ईडीनं जप्त केली आहे. या कारखान्याची किंमत ५० कोटी २० लाख इतकी आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी PMLA कायद्याअंतर्गत ईडीनं ही कारवाई केली आहे. याच प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं रोहित पवारांची चौकशी देखील केली होती. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या ठिकाणी हा कारखाना स्थित आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola