Republic Day 2023 : राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, राज्यातील ७४ पोलीस मानकरी
राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा केली आहे. राज्यातील 74 पोलीस यामध्ये मानकरी ठरले आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींसह ४ पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' घोषित करण्यात आलं आहे. ३१ जणांना पोलीस
शौर्यपदक तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आलं आहे.