Assembly Speaker : आमदार अपात्रतेबाबत सुनील प्रभू, नार्वेकर, फडणवीस आणि अजित पवारांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

१६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना ७९ पानांचं निवेदन देणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला जाणार आहे. कोर्टानं जो निर्णय दिला आहे, त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गट अध्यक्षांकडे करणार आहे... त्याचसोबत, ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचं निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही दिलंय. त्यानंतर आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी केलीय. तर अध्यक्षांवर दबाव टाकू नये, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. असं सगळं होत असतानाच, विधानसभा अध्यक्ष परदेशातून आले आणि, १६व आमदारांबाबत योग्य तोच निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलंय. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, १६ आमदार अपात्र होणार नसल्याचं सूचक वक्तव्य केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram