Ravi Rana vs Bachchu Kadu :रवी राणांवर सरकार का फिदा हे आता विचारावं लागेल, बच्चू कडूंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरु असलेला वाद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारात सोडवला जाणार आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले असा आरोप राणा यांनी केला आणि कडू यांनी त्यांना पुरावे देण्याचं आव्हान दिलं. अमरावतीच्या दोन्ही आमदारांमधल्या संघर्षात अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे दोघांनाही भेटणार आहेत... त्यामुळे हा वाद आता मिटणार की चिघळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
Continues below advertisement