Ramdas Kadam On Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याची टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलीय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या काळात मुलगा योगेश कदम आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी दिला. आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट अनिल परब यांनी रचला होता. त्याचसोबत शिवसेनेच्या फुटीला अनिल परब जबाबदार असून त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी. अनिल परब यांची जागा जेलमध्येच असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केलाय.
Continues below advertisement