Rajasthan Politics | राजस्थानमधील गहलोत सरकारवर अस्थिरतेचे ढग, काँग्रेस आमदारांची आज बैठक
Continues below advertisement
आज म्हणजे सोमवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेदहा वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीला दिल्लीहून निरीक्षकही येणार आहेत. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नाहीत. मुख्यमंत्री गहलोत यांच्यासोबत यापुढे काम करणे अवघड असल्याचे पायलट यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले.
Continues below advertisement
Tags :
Rajasthan Political Crisis Rajasthan Crisis Rajasthan Assembly JP Nadda Sachin Pilot Ashok Gehlot Jyotiraditya Scindia Sonia Gandhi Rahul Gandhi BJP Amit Shah Congress