Rajasthan Government Crisis | सचिन पायलट यांच्याशी चर्चा करण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सचिन पायलट काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिलं आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधीने सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी पायलट यांनी हे स्पष्ट केलं.