Raj Thackeray Sabha : रत्नागिरी शहरात राज ठाकरेंचा दौरा, रिफायनरीवर कोणती भूमिका घेणार? : ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होतेय. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर संध्याकाळी ७च्या सुमाराला राज यांचं भाषण होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण याआधी राज यांनी रिफायनरीवर सविस्तर भूमिका मांडलेली नाही. तसंच,राष्ट्रवादी काँग्रेसमधील कालच्या नाराजीनाट्यावर राज ठाकरे बोलतात का, याचीही उत्सुकता आहे.