Raj Thackeray On Maharashtra Politics : परदेशातला प्रकल्प पहिल्यांदा महाराष्ट्रात येतो - राज ठाकरे

Continues below advertisement

'कोरोनाच्या काळामुळे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका दोन ते अडीच वर्ष लांबणीवर गेल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये निवडणुका होतील असं वाटत होतं. मात्र मी यांना (मनसे नेत्यांना) सांगत होतो की, मला वातावरणात निवडणूक दिसत नाही आहे. आता या निवडणुका पुढे जात डिसेंबर आला. आता पुन्हा कानावर येत आहे की पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका लागतील'', असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. गोरेगाव येथील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात ते असं म्हणाले आहेत. यावेळी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचं राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram