Raj Thackeray : राज ठाकरे, शिंदे-फडणवीसांच्या भेटीला, वांद्रेतील ताज लँड्स अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये बैठक

मुंबई : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Eelction) जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील उपस्थित होते. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीतील अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् अ‍ॅण्ड येथे ही बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola