Raj Thackeray Dasara Melava Special Report : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंच्या लढाईत राज ठाकरेंची एन्ट्री

MNS on Shivsena Dasara Melava: शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे. शिवसेनेकडून (Shivsena) शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली आहे. तर, शिंदे गटाकडूनही (Shinde Group) दसरा मेळावा हायजॅक करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) या वादावर भाष्य केले आहे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, हे दोन्ही गटांनी लक्षात घ्यावं असा टोला मनसेने लगावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola