Raj Thackeray on Hindi : हिंदीची सक्ती करून दाखवाच,दुकानचं नाही शाळाही बंद करणार
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. हिंदी सक्ती लागू करून दाखवाच, दुकानच नाही तर शाळाही बंद करणार असे राज ठाकरे म्हणाले. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबईत ये समुद्रात डूबे डूबे के मारेंगे असे म्हणत राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रतिआव्हान दिले आहे. यासह मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठी द्वेष्ट्यांनादेखील थेट इशारा दिला आहे. राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी निश्चित करावी असेही म्हटले आहे. एका नेत्याने महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघण्याचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी नाही असेही नमूद केले आहे. इतर शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. हिंदी सक्तीची करण्यामागे कोणाचा दबाव आहे, असा प्रश्नही विचारला आहे.