Maharashtra Politics : Eknath Shinde यांची Uddhav Thackeray यांच्यावर जळजळीत टीका
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंवर तीव्र टीका केली. ज्यांचा पक्ष संपला, त्यांच्यासोबत जाण्याची वेळ ठाकरेंवर आल्याचे शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला. 'केलेलं कर्म शेवटी इथंच फेडावं लागतं,' असे शिंदे यांनी म्हटले. फडणवीसांनी चाळीस-पन्नास फोन केले, पण एकही उचलला गेला नाही, असे शिंदे यांनी सांगितले. महापौरपद शिवसेनेला दिल्याचेही त्यांनी नमूद केले. 'एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन,' अशी टोकाची भाषा वापरल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. शरद पवार यांनीही आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्याचा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला. जनतेच्या मतांची माती कोणी केली, असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्राने एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. गुवाहाटीला असतानाही फोन आणि निरोप यायचे, दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचे, असे शिंदे यांनी सांगितले. आठ मंत्री आणि पन्नास आमदार सत्तेतून बाहेर पडले आणि सत्ता सोडली, असेही त्यांनी स्पष्ट केले. सॉफ्टल हॉटेल आणि हयात हॉटेलचाही उल्लेख करण्यात आला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement