Rahul Gandhi on Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर राहुल गांधींचा मोठा आरोप
Rahul Gandhi on Maharashtra Election: काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul gandhi) पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. राहुल गांधी यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार (Rahulg Gandhi on Maharashtra Election) केल्याचा आरोप करत, गेल्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत अवघ्या 5 महिन्यांत तब्बल 8% वाढ केली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.
अवघ्या 5 महिन्यात तब्बल 8 टक्के मतदारांमध्ये वाढ- राहुल गांधी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत गेल्या 5 महिन्यांत तब्बल 8% वाढ झाली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी (Rahul gandhi) एक्स या समाज मध्यमावर पोस्ट करत हे आरोप केले आहे. तर काही बूथवर 20-50% वाढ झाली आहे. सोबतच BLO नी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचेही यात म्हटलं आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असतानाही निवडणूक आयोग गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.