Rahul Gandhi खासदारकी बहाल, लोकसभेतल्या गदारोळामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित : ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाली आहे. त्यामुळे तब्बल साडे चार महिन्यांनी राहुल गांधी आज संसदेत आले. इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर राहुल लोकसभेत गेले. मात्र कामकाज सुरू होताच लोकसभा तहकूब झाली. गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी राहुल यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान, विरोधक उद्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. त्याच्या चर्चेत राहुल गांधी सहभागी होतात का, ते पाहावं लागेल.
Continues below advertisement