Rahul Gandhi in Lok Sabha : 140 दिवसानंतर राहुल गांधी संसदेत; विरोधकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

Continues below advertisement

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी राहुल यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान, विरोधक उद्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. त्याच्या चर्चेत राहुल गांधी सहभागी होतात का, ते पाहावं लागेल.  दरम्यान, राहुल गांधी आज संसद भवनात आले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram