Pune : पुणे पालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपण्याआधी राष्ट्रवादी-भाजपमध्ये उदघाटनाची स्पर्धा
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आज संध्याकाळी संपतेय. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांमधे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमीपूजनांचा धडाका पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील तब्बल तीस विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन होणार आहे.