Prasad Lad : शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, या वक्तव्यावर प्रसाद लाड यांची दिलगिरी
Continues below advertisement
राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडलीय.. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलंय. काल कोकण मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.. दरम्यान या वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.. तसंच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं असं देखील ते म्हणालेत..
Continues below advertisement