Prakash Shendge On Prakash Ambedkar :धनदांडगे नेत्याची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांचा निर्णय बदलला

प्रकाश आंबेडकर यांची अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी जाहीर सभा मिरजेत पार पडणार आहे . तर दुसरीकडे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय. वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी टीका शेंडगेंनी केलीय. तर प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात असं काय घडलं,की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. असा सवाल देखील प्रकाश शेंडगेंनी उपस्थित केला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola