Majha Vishesh| दुधात प्रश्नात मिठाचा खडा टाकतंय तरी कोण? दुधाच्या दराला राजकारणाचं विरजण! माझा विशेष

Continues below advertisement

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणण्याचे सूतोवाच आज दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. गेले दोन दिवस राज्यातील वातावरण दूध आंदोलनामुळे ढवळून निघाले आहे. काल भाजपने तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलनं केली, दुधाला मिळणाऱ्या दराबाबत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी 16 जुलै रोजीच 21 जुलैला बैठकीचे आमंत्रण पाठवले होते, आज ही बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला  पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भारणे , माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे  प्रमुख,  तसेच राज्यभरातील  विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक,  बैठकीला व्हिडिओ काँन्फरन्स व्दारे सहभागी झाले. दुधाच्या प्रश्नाचं राजकारण कोण करतंय हा प्रश्न सध्या उपस्थित होतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram