Pm Narendra Modiआज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार,Rahul Gandhi यांची पंतप्रधान मोदींवर टीका
पंतप्रधान मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. लोकसभेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावर भाषण करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर आक्रमक टीका केली. अग्निवीर योजना , अदानी मुद्यांवर राहुल गांधी यांनी काल सभागृहात मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत हे देशाला जाणून घ्यायचे असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने फोटो सभागृहात झळकावले. दरम्यान या सगळ्यावर आज पंतप्रधान मोदी आज दुपारी सभागृहात काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..