PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः काँग्रेस (Congress) आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध हा देशाच्या प्रगतीस अडथळा असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात परिवारवादी राजकारणावर निशाणा साधत, अशा पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना संसदेत पोहोचू द्यायचे नाही, असा आरोप केला. तसेच 21व्या शतकातील महिलांना सर्व घडामोडींची जाणीव असून त्या योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Congress Mention Count : संबोधनात काँग्रेसचा वारंवार उल्लेख

महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केला. अंदाजे 60 वेळा काँग्रेसचे नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला. विविध महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने विरोध केल्याचे सांगत त्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायदा (UCC) यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola