Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या (AIMIM) माजी नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या सहर शेख यांचे वडील युनूस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांशी 15-20 मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत "करारा जबाब मिलेगा, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू," असा इशारा दिला आहे.
सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनिस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरितांसाठी 'नमुना 10' लागू असताना, युनिस शेख यांनी 'नमुना 8' चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवला.