PM Modi Offer Sharad Pawar, Uddhav Thackeray: मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना मोठी ऑफर
PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. शरद पवारांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.