Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Case : ज्यांना निर्दोष सोडलं त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार

Continues below advertisement

पुणे :  तब्बल 11 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा  (Dr. Narendra Dabholkar Murder Case)  निकाल  लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं आहे. या दोघांना  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि याच प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर  यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. या संपूर्ण निकालाचं हमीद दाभोळकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे. कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram